Топ-100
Back

ⓘ पनोरे हे गाव साटवली-इसवली रस्त्यावर वसलेले आहे. लांजा-साटवली एसटी बसने गेल्यास साटवली बस थांब्यावर उतरून पुढे २ किमी चालत किंवा सायकलने जाता येते. लांजा-इसवली ए ..
                                     

ⓘ पनोरे

पनोरे हे गाव साटवली-इसवली रस्त्यावर वसलेले आहे. लांजा-साटवली एसटी बसने गेल्यास साटवली बस थांब्यावर उतरून पुढे २ किमी चालत किंवा सायकलने जाता येते. लांजा-इसवली एसटी बसने थेट पनोरे गावात जाता येते.

                                     

1. लोकजीवन

मुख्यतः कुणबी समाजातील लोक येथे पूर्वीपासून स्थायिक आहेत. फणस, काजू, रातांबा, आणि हापूस आंबा ह्यांचे येथे उत्पादन घेतले जाते. बाजार-रहाटासाठी दर बुधवारी भरणाऱ्या साटवली आठवडा बाजारावर येथील लोक अवलंबून असतात. येथे दुग्ध व्यवसाय तसेच बकरीपालन व्यवसाय हे शेतीपूरक जोडधंदे म्हणून केले जातात. लोक मेहनती, कष्टाळू, जिद्दी तसेच काटक आहेत. बरेचसे लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबईत राहतात.गणपती, होळी, शिमगा सण साजरा करण्यासाठी ते प्रत्येक वर्षी आवर्जून गावी येतात.

                                     

2. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.