Топ-100
Back

ⓘ परनाळी. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पाव ..




                                     

ⓘ परनाळी

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

1. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २३५ कुटुंबे राहतात. एकूण ९८६ लोकसंख्येपैकी ५०८ पुरुष तर ४७८ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.९७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.७३ आहे तर स्त्री साक्षरता ७८.८४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.३४ टक्के आहे. मुख्यतः वंजारी आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.

                                     

2. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुध्दा बोईसर रेल्वे स्थानकावरुन दिवसभर उपलब्ध असतात.

                                     

3. जवळपासची गावे

कुडण, दहिसर तर्फे तारापूर, आंबटपाडा, मुंडवळी, साळगाव, नवी देलवाडी, अक्करपट्टी, उनभाट, पोफरण, पथराळी, वेंगणी ही जवळपासची गावे आहेत.परनाळी, मुंडवळी आणि आंबटपाडा ही गावे परनाळी ग्रामपंचायतीमध्ये येतात.