Топ-100
Back

ⓘ न्याहाळे बुद्रुक. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण ..
                                     

ⓘ न्याहाळे बुद्रुक

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

1. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४१५ कुटुंबे राहतात. एकूण १९०४ लोकसंख्येपैकी ९६७ पुरुष तर ९३७ महिला आहेत. गावाची साक्षरता ४६.२३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५४.९६ आहे तर स्त्री साक्षरता ३७.६० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३६४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.१२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.

                                     

2. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्शासुद्धा जव्हारवरुन उपलब्ध असतात.

                                     

3. जवळपासची गावे

गराडवाडी, ग्रामीण जव्हार, गणेशनगर, नंदनमाळ, रायतळे, राधानगरी, श्रीरामपूर, केळघर, न्याहाळेखुर्द, रामपूर, आपटाळे ही जवळपासची गावे आहेत.न्याहाळेबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये न्याहाळेबुद्रुक, पिंपळगाव, राधानगरी, श्रीरामपूर ही गावे येतात.