Топ-100
Back

ⓘ पिंपरूण. जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर पुढे आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, वाडोळी रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे ..




                                     

ⓘ पिंपरूण

जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर पुढे आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, वाडोळी रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

2. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १३८ कुटुंबे राहतात. एकूण ६२६ लोकसंख्येपैकी ३१२ पुरुष तर ३१४ महिला आहेत. गावाची साक्षरता ४८.१९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५८.५७ आहे तर स्त्री साक्षरता ३७.६५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.४५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.

                                     

3. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्शासुद्धा जव्हारवरुन उपलब्ध असतात.

                                     

4. जवळपासची गावे

चांभारशेत, पिंपळशेत, पळशीण, देवगाव, देहरे, दाभोसे, वाडोळी, हिरडपाडा, सारसुण, सुर्यनगर, हातेरी ही जवळपासची गावे आहेत.दाभोसा-पिंपरुणा ग्रामपंचायतीमध्ये दाभोसे आणि पिंपरुण गावे येतात.