Топ-100
Back

ⓘ पुंजावे. डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आंबेसरीनाका बसथांबा, धुंदळवाडी बसथांबा आणि पुंजेश्वर महादेव मंदिर-धुंदळवाडी गेल्यानंतर हे गाव लागते ..
                                     

ⓘ पुंजावे

डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आंबेसरीनाका बसथांबा, धुंदळवाडी बसथांबा आणि पुंजेश्वर महादेव मंदिर-धुंदळवाडी गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २६ किमी अंतरावर आहे.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

                                     

2. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८३ कुटुंबे राहतात. एकूण ४६७ लोकसंख्येपैकी २३२ पुरुष तर २३५ महिला आहेत. गावाची साक्षरता ४७.३१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५५.३८ आहे तर स्त्री साक्षरता ३९.२९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.२७ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.

                                     

3. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरुन उपलब्ध असतात.

                                     

4. जवळपासची गावे

गांगणगाव, बोडगाव, नागझरी, तालोठे, सासवंद, चिंचाळे, आंबिवळीतर्फेबहारे, पांढरतारागाव, करंजवीरा, शिसणे, जिनगाव ही जवळपासची गावे आहेत.सासवंद-तालोठे समूह ग्रामपंचायतीमध्ये पुंजावे, सासवंद आणि तालोठे ही गावे येतात.