Топ-100
Back

ⓘ पिंपळशेत खुर्द. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण अ ..




                                     

ⓘ पिंपळशेत खुर्द

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

1. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२८ कुटुंबे राहतात. एकूण ६०६ लोकसंख्येपैकी २९० पुरुष तर ३१६ महिला आहेत. गावाची साक्षरता ३८.८२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५१.०४ आहे तर स्त्री साक्षरता २७.८८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.८४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणूनही काम करतात.काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन,तसेच गायपालनही केले जाते.

                                     

2. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुध्दा डहाणूवरुन उपलब्ध असतात.

                                     

3. जवळपासची गावे

सूर्यानगर, वारोटी, नवनाथ,गंजाड, चांदवड, रायतळी, शेलटी, वाधाणे, रानशेत, चारोटी, वाघाडी ही जवळपासची गावे आहेत.निकाणे समूह ग्रामपंचायतीमध्ये निकाणे, पिंपळशेत खुर्द,आणि शेलटी ही गावे येतात.