Топ-100
Back

ⓘ पाळे. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ् ..
                                     

ⓘ पाळे

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

                                     

1. लोकजीवन

हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५२३ कुटुंबे राहतात. एकूण २५६९ लोकसंख्येपैकी १२४० पुरुष तर १३२९ महिला आहेत. गावाची साक्षरता ५८.८४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७२.२४ आहे तर स्त्री साक्षरता ४६.१९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३५१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.६६ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.

                                     

2. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरुन उपलब्ध असतात.

                                     

3. जवळपासची गावे

सरावळी, सावटा, चारी तर्फे कोटेबी,आगवण, मोठापाडा, कोटबी, देहाणे, धामणगाव, कोमगाव, वाणकस, दापचरी ही जवळपासची गावे आहेत.देहाणे ग्रामपंचायतीमध्ये देहाणे आणि पाळे ही गावे येतात.