Топ-100
Back

ⓘ नृत्य - नृत्य, कूचिपूडि नृत्य, तारपा नृत्य, आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस, गेर नृत्य, चाम नृत्य, साल्सा, नृत्य ..
                                               

नृत्य

नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणू ...

                                               

कूचिपूडि नृत्य

कूचिपूडि ही आंध्र प्रदेश मधील नृत्यशैली आहे.हिला अट्ट भागवतम असेही म्हटले जाते. आंध्र प्रदेशातील या नृत्यशैलीचा विकास कृष्णदेव आर्य यांच्या काळात इ.स. १५१० ते १५३० या काळात झाला.इ.स. पूर्व दुसर्‍या शतकापूर्वी या कलेचा उगम झाला असून आंध्र प्रदेशातील भागवतार ब्राह्मणांकडून हे नृत्य सांभाळले गेले. वैष्णव भक्तीने ओतप्रोत भरलेला हा नृत्यप्रकार आहे. सहाव्या शतकातील भक्तिसंप्रदायाची चळवळ पुढे नेण्यात या कलाप्रकाराचे विशेष योगदान आहे. कूचिपूडि या गावात रामायणातील कथा या गीत,नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर करणारे नट समूह आहेत.त्यांना कुशीलव असे म्हणतात. यामध्ये अधिकतर पुरूष पात्रांचा सहभाग असत ...

                                               

तारपा नृत्य

वारली आदिवासी जनजातीचे हे पारंपरिक नृत्य आहे.तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे असणारे वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते असे या नृत्याचे स्वरूप आहे. दादरा आणि नगरहवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे.

                                               

आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस

दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था ने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. तिच्या आदेशावरून इ.स. १९८२ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी, जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते. नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आं ...

                                               

गेर नृत्य

गेर नृत्य हा सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात, महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमाभागात राहणाऱ्या आदिवासी पावरा समाजात प्रचलित असलेला नृत्यप्रकार आहे. गेर होळीच्या निमित्ताने केले जाते.

                                               

चाम नृत्य

चेहऱ्याला मुखवटे लावून आणि रंगीबेरंगी चित्रविचित्र पोशाख घालून केले जाणारे हे नृत्य तिबेटमधील बौद्ध धर्मातील उत्सवांचे महत्त्वाचे अंग आहे. या बौद्ध धार्मिक नृत्याचे तीन महत्त्वाचे भाग आहेत. या नृत्यातून नैतिक उपदेश केला जातो. १. हरीण आणि शिकारी यांचे नृत्य २. राजपुत्र आणि राजकन्या यांचे नृत्य ३. मृत आत्म्यांना दूर पाठवून एखादे स्थान पवित्र करण्यासाठीचे नृत्य

साल्सा (नृत्य)
                                               

साल्सा (नृत्य)

साल्सा ही मूलतः क्युबा देशातून उगम पावलेली, जोडीने नृत्य करायची नृत्यशैली आहे. युरोपीय व आफ्रिकी संस्कृतींमधील संगीत व तालपरंपरांच्या प्रभावातून साल्शाची निपज झाली, असे मानले जाते. लॅटिन अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप या ठिकाणी लोकप्रिय असलेला ही नृत्यशैली आशिया व आफ्रिका खंडांतही रसिकप्रिय होत आहे.