Топ-100
Back

ⓘ व्यंगचित्र - व्यंगचित्रकार, चेहरा, सुधीर तेलंग, मार्मिक, साप्ताहिक, मराठी मन, केकी मूस, व्यंगचित्र ..
                                               

व्यंगचित्रकार

व्यंगचित्रे काढणाऱ्या चित्रकारास व्यंगचित्रकार म्हणतात. व्यागचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.

                                               

चेहरा

प्राण्यांच्या डोक्याच्या पोटाकडील पृष्ठभागावरील संवेदक इंद्रियांच्या समुदायाला चेहरा असे म्हणतात. मानवांच्या संदर्भात चेहऱ्यात केस, कपाळ, भुवया, पापण्या, डोळे, नाक, गाल, कान, तोंड, ओठ, दात, हनुवटी या सर्वांची गणना होते. चेहऱ्याचा उपयोग हावभाव व्यक्त करण्यासाठी, अन्य सजातीय प्राण्यांमधून विशिष्ट प्राण्याची ओळख पटवण्यासाठी होतो.

                                               

सुधीर तेलंग

सुधीर तेलंग हे एक मराठी व्यंगचित्रकार होते. त्यांची व्यंगचित्रे विविध वर्तमानपत्रांतून ३५ वर्षे प्रसिद्ध झाली. लहानपणापासून तेलंग यांना टिनटिन, फँटम, ब्लाँडी या व्यक्तिरेखांचे आकर्षण होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले व्यंगचित्र इंदिरा गांधींचे काढले. लालकृष्ण अडवाणींची किमान एक हजार चित्रे त्यांनी काढली आहेत. सुधीर तेलंग यांची व्यंगचित्रे प्रथम राजस्थान पत्रिकेत प्रसिद्ध झाली. १९८२ मध्ये द इलस्ट्रेटेड वीकलीत व नंतर दिल्लीच्या एका हिंदी पत्रात येऊ लागली. पुढे हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि एशियन एज या वृत्तपत्रांतूनही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. त् ...

                                               

मार्मिक (साप्ताहिक)

१९५० ते १९६० पर्यंतचा संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा हा मराठी माणसाचा एकजुटीचा पहिला लढा. मोर्चा, आंदोलने, निषेध सभा, निवडणुका यांनी भरगच्च भरून गेलेला हा इतिहास. या इतिहासातूनच मराठी माणसाचे असे मत झाले की लढल्याशिवाय मराठी माणसाला काही मिळतच नाही. महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात आकस आहे. आपण संघटीत झालो तर आपले हित साधू शकलो हेही मराठी माणसाला कळून आले आणि नेमकी त्याच वेळी ‘मार्मिक’ची सुरुवात झाली. शिवसेनेच्या स्थापनेची बीजे ‘मार्मिक’मध्ये दिसून येतात. त्या ‘मार्मिक’चा इतिहास मनोरंजक आहे. सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ‘फ्री प्रेस’ मध्ये नोकरी करीत असत. त्या नोकरीतून कुटुंब चालविण्य ...

                                               

मराठी मन

मराठी मन डॉट इन हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०१० पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे. मन हिरवे मन ओले, मन अंबर नदी काठी! मन नितळ मन माती, मन मराठी मन मराठी. हे या संकेतस्थळाचे ब्रिदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सर्व विषयावर कविता हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून शिवाजी साचा:नेमके हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत. दर महिन्याला साधारण १००० ते १५००० लोक या संकेतस्थळास भेट देतात मन हिरवे मन ओले, मन अंबर नदी काठी! मन नितळ मन माती, मन मराठी मन मराठी. नक्कीच पहा. marathimann.in मराठी कवीता | मराठी गाण ...

                                               

केकी मूस

कैकुश्रू माणेकजी उर्फ केकी मूस मुंबईत जन्मलेले व पुर्व खान्देशातील चाळीसगांव येथे राहिलेले जागतिक कीर्तीचे चित्रकार व छायाचित्रकार होते. त्यांची "टेबल टॉप फोटोग्राफी" जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केकीने कामे केली. त्याच्या टेबलटॉप फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली.मराठी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, गुजराती, उर्दू या भाषा त्याला अवगत होत्या. व्हिन्सेंट व्हॅंगॉंगचं चरित्र केकी मूस याने मराठीत अनुवादित केले होते.

व्यंगचित्र
                                               

व्यंगचित्र

गतकालीन/ समकालीन व्यक्ती-घटना-प्रसंगात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचा म्हणजे सूचितार्थाचा हास्यजनक मार्मिक आविष्कार करणारे चित्र म्हणजे व्यंगचित्र.