Топ-100
Back

ⓘ कालमापन - कालमापन, पोटॅशियम आरगॉन कालमापन पद्धती, कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती, विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धती, ऑब्सिडियन कालमापन पद्धती, सौरवर्ष ..
                                               

कालमापन

कालमापनासाठी संदर्भादाखल नियमित अशी एकादी गती आवश्यक असते. गेली हजारो वर्षे कालमापनासाठी ग्रहभ्रमणाचा --विशेषतः पृथ्वीच्या परिभ्रमणाचा-- उपयोग माणसांनी केला आहे. प्राचीन काळी माणसांनी "दिवस" आणि "रात्र" ह्यांच्या जोडलेल्या कालव्याप्तीचे २४ समान भाग केले, आणि प्रत्येक भागाला "तास" अशी संज्ञा दिली; तासाचे ६० समान भाग करून प्रत्येक ६०व्या भागाला "मिनिट" ही संज्ञा दिली. पुन्हा प्रत्येक मिनिटाच्या ६०व्या भागाला "सेकंद" ही संज्ञा दिली. २४ आणि ६० ह्या अंकांचे २, ३, ४, ५, आणि ६ ह्या अंकांनी सहज पुनर्विभाजन होऊ शकते म्हणून प्राचीन बाबिलोनी संस्कृतीत २४ आणि ६० ह्या अंकांचा वापर लोकांनी बुद्धीची चमक ...

                                               

पोटॅशियम आरगॉन कालमापन पद्धती

पोटॅशिअम अर्गोन कालमापन पद्धती ही जे. एफ. एव्हर्णडेन आणि जी. एच. कर्टिस यांनी इ.स. १९६१ मध्ये शोधून काढली. या पद्धतीत कालमापनाचा आवाका खूप मोठा असतो. अडिच हजार ते चार अब्ज वर्षे इतके जुने अवशेष या पद्धतीने कालमापीत करता येतात. पोटॅशिअम अर्गोन पद्धतीत पोटॅशिअम ४० K या घटकाचे अर्धे आयुष्य १.३ अब्ज + ४० दशलक्ष वर्ष इतके प्रचंड आहे. पृथ्वीच्या कवचात पोटॅशिअम हा घटक फार मोठ्या प्रमाणावर आढळतो. हाच घटक जवळजवळ प्रत्येक खनिजात आढळतो. याचे विघटन झाल्यावर त्यातून अर्गोन ४० हा वायू तयार होतो. याचे संक्षिप्त रुप ४० Ar असे मांडतात. खडकाच्या घडणीत हा अर्गोन ४० नाहिसा होतो. खडकाची घडण पूर्ण झाल्यावर ४० K ...

                                               

कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती

पुरातन वस्तूंचा काळ ठरविण्यासाठी कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती उपयोगात आणली जाते. याचा शोध विल्लर्ड लिब्बी यांनी शिकागो विद्यापीठात लावला. प्रत्येक सजीव गोष्ट वनस्पती,प्राणी,मानव जिवंत असताना हवेतील कार्बन डायऑक्साईड घेत असते. या कार्बन डायऑक्साईडच्या घटकांमध्ये कार्बन १४ नावाचा घटक असतो. हा कार्बन १४ किरणोत्सर्गी आहे. प्राणी जिवंत असताना या कार्बन १४ ची किरणोत्सर्जनाची क्रिया सतत चालू असते. सर्व प्राण्यांमध्ये कार्बन १४ चे प्रमाण एकच असते आणि म्रृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून कार्बन १४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या कार्बन १४ चा अर्धा भाग म्रृत्यूनंतर ५५६८ वर्ष ...

                                               

विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धती

विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धती या पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने भूविज्ञानशास्त्र शाखेतील अवशेषांचे कालमापन करताना होतो. एक अब्ज वर्ष पूर्व इतक्या प्राचीन काळातील अवशेषांचे कालमापन या पद्धतीने करता येते. पुरातत्वीय अवशेषांच्या दृष्टीने पाहता या पद्धतीने प्रामुख्याने एक ते दहा लाख या मर्यादेतील अवशेषांचे कालमापन योग्य रितीने होऊ शकते. प्रत्येक खनिजात व नैसर्गिक काचेत यूरेनिअम हा घटक थोड्याफार प्रमाणात का होईना असतोच. या यूरेनिअमचे आपोआप विघटन चालू असते. या विघटनाला फिजन डिके असे म्हणतात. या विघटनाच्या क्रियेमुळे सबल अणू तयार होऊन ते त्या वस्तूंवर संकुचित तेजोरेषा निर्माण करतात. वस्तू जितकी प्र ...

                                               

ऑब्सिडियन कालमापन पद्धती

ऑब्सिडियन कालमापन पद्धती ऑब्सिडियम ही एक प्रकारची नैसर्गिक काच आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून ती उत्पन्न होते व ती हिरवट वा काळपट रंगाची असते. तिला उत्कृष्ट चकाकीही असते. याच्यातील कणखरपणामुळे या काचेपासून अश्मयुगीन मानवाने आपली हत्यारे बनविल्याचे आढळून येते. याशिवाय या काचेपासून बनविलेले नाकातील कानातील अलंकारही उपलब्ध झाले आहेत. युरोपमधील देशात तसेच जपानमध्ये ऑब्सिडियम आढळून येते. ऑब्सिडियम काचेच्या पृष्ठभागावर वातावरणातील बाष्पाचा थर जमा होऊ लागतो. हा तर इतका सूक्ष्म असतो की तो नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही. हा बाष्पथर म्हणजे रासायनिक प्रक्रियेने चढलेला गंज नसतो. फक्त ऑब्सिडियमच्या द ...

                                               

वृक्षवलय कालमापन पद्धती

वृक्षवलय कालमापन पद्धती या पद्धतीचा शोध ए.ई. डग्लस या खगोलशास्त्रज्ञाने लावला. १९०४ पासून डग्लस यांनी सूर्यावरील डाग, हवामानातील बदल आणि वृक्षांची वाढ यांचा एकमेकांशी असणारा संबंध या क्षेत्रात संशोधन सुरु केले. याचा अभ्यास करताना त्यांना असे आढळून आले की पिवळ्या पाईन वृक्षाच्या खोडाच्या वर्तुळाचा त्या वृक्षाच्या कालमापनास उपयोग करता येतो. ही कालमापन पद्धती दोन तत्वांवर आधारलेली आहे. त्यातील पहिले असे की विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या वर्तुळाची ठरावीक रचना असते. दुसरे असे की विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या वर्तुळांची घडण समकाल स्वरुपाची असते. ही तत्वे लक्षात घेऊन विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या खोडाचे ...

                                               

सौरवर्ष

सौरवर्ष म्हणजे कालमापनात सूर्य अश्विनी नक्षत्राच्या आरंभापासून निघून सर्व नक्षत्रात भ्रमण करीत पुन्हा त्याच ठिकाणी येण्यास लागणारा वेळकाल.त्यास क्रांतिवृत्तात सूर्याच्या परिभ्रमणास लागणारा काळ असेही म्हणतात. तो ३६५ दिवस,१५ घटिका,२२ पळे आणि ५३.८५०७२ विपळे इतका असतो किंवा ३६५.२५६३६०४२ दिवस इतका असतो. याच सौरवर्षाचे आधारावर हिंदू कालमापन आधारलेले आहे.

                                               

बुधप्रदोष

भारतीय सौर कालगणना पंचांग शुक्रप्रदोष मंगळदोष बृहस्पतिप्रदोष अर्कप्रदोष अंगारकी चतुर्थी रविप्रदोष सोमप्रदोष बुधप्रदोष चांद्रमास चतुर्मास शनिप्रदोष बाह्य दुवे प्रदोष - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश

                                               

शनिप्रदोष

रविप्रदोष मंगळदोष शनिप्रदोष शुक्रप्रदोष बृहस्पतिप्रदोष पंचांग चतुर्मास सोमप्रदोष चांद्रमास अर्कप्रदोष अंगारकी चतुर्थी भारतीय सौर कालगणना बुधप्रदोष बाह्य दुवे प्रदोष - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश

इस्लामी कालगणना
                                               

इस्लामी कालगणना

इस्लामी कालगणना किंवा चांद्र हिजरी कालगणना इस्लाम धर्मात प्रचलित असलेली व चंद्राच्या परिभ्रमणकाळावर आधारित, अशी कालगणनेची पद्धत आहे. हिजरत या शब्दाचा अरबीमध्ये प्रयाण असा अर्थ आहे. ज्या दिवशी महंमद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेस जुलै १६, इ.स. ६२२ रोजी प्रयाण केले त्या दिवसासून या कालाची गणना सुरू झाली, असे समजत असल्याने त्या कालगणनेस हिजरी असे म्हटले जाते. बहुतांश मुस्लिम राजघराण्यांतील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळतात.

दिनदर्शिका
                                               

दिनदर्शिका

दिनदर्शिका ही वर्षातील तारखा कोष्टक स्वरूपात दाखवण्यासाठी वापरली जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेत तारखांबरोबर महिने, आठवड्याचे वार, सुट्ट्या इत्यादी माहिती दिली जाते. याखेरीज दिनदर्शिकेच्या प्रकारानुसार त्यामध्ये अधिक माहिती दाखवली जाते, उदा. मराठी दिनदर्शिकेत एकदशी, संकष्टी व मराठी सणांची माहिती असते, तर बॅंकेच्या दिनदर्शिकेत बॅंकेच्या सुट्ट्यांची महिती असते.