Топ-100
Back

ⓘ विज्ञान - विज्ञान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, नेहरू विज्ञान केंद्र, न्यायसहायक विज्ञान, नैसर्गिक विज्ञान, भारतीय विज्ञान संस्था, धातुशास्त्र ..
                                               

विज्ञान

एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने systematic study केलेल्या अभ्यासास विज्ञान असे म्हणतात. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान Science होय. लॅटिन भाषेतील Scientia सायन्शिया या शब्दावरून इंग्रजीतील ‘सायन्स’ हा शब्द तयार झालेला आहे. विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. तथापि, सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हटले जात नाही - उदा. अध्यात्म.

                                               

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८"ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. सध्या या विद्यापीठाचे कुलगुरू हे डॉ. अरुण जामकर आहेत. विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे.

                                               

नेहरू विज्ञान केंद्र

नेहरू विज्ञान केंद्र भारतातील सर्वात मोठे परस्परसंवादी विज्ञान केंद्र आहे. ते मुंबईतील वरळी येथे स्थित आहे. केंद्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ओळखले जाते. १९७७ सालीत लाइट ॲण्ड साइट प्रदर्शनासह हे केंद्र सुरू झाले आणि १९७९ मध्ये तिथे एक सायन्स पार्क तयार करण्यात आला.११ नोव्हेंबर १९८५ रोजी ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते जनतेसाठी खुले करण्यात आले. काळानुसार बदल ह्या केंद्रात विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्या आणि साध्या सरळ भाषेत समजून घेता येतात.येथे मुलांसाठी विज्ञान उद्यान साकारलेले आहे. केंद्रात शिरताक्षणीच उजव्या बाजूला उद्यान आहे तर डाव्या बा ...

                                               

न्यायसहायक विज्ञान

निरनिराळ्या विज्ञान शाखांचे एकत्रीकरण करून ही बहुआयामी शाखा बनली आहे. येथे निरनिराळ्या शास्त्रशाखांतील शास्त्रज्ञ येतात. न्यायसहायक विज्ञानशाखेच्या प्रयोगशाळेत मानसोपचार तज्ज्ञ, विषतज्ज्ञ व रोगतज्ज्ञ तर असतातच, शिवाय हस्ताक्षरतज्ज्ञ, छायाचित्रकार व वर्णनावरून चित्र रेखाटणारे चित्रकारही असतात. प्रयोगशाळेत पुरावा उचलण्यासाठीही काही विशिष्ट चिमटे, कागद इत्यादी साधनांचा व रसायनांचा वापर करतात.

                                               

नैसर्गिक विज्ञान

नैसर्गिक विज्ञान ही निरीक्षण आणि प्रयोगावरून प्रायोगिक पुराव्याच्या आधारावर नैसर्गिक समस्येचे वर्णन, अंदाज आणि समजण्याशी संबंधित विज्ञानशास्त्राची एक शाखा आहे. संशोधन आणि निष्कर्षांची पुनरावृत्ती यासारख्या यंत्रांचा वापर वैज्ञानिक प्रगतीची वैधता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केला जातो. नैसर्गिक विज्ञानाच्या दोन मुख्य शाखा आहेत. भौतिक विज्ञान. भौतिक विज्ञान हे शाखांमध्ये विभाजित केले आहे, ज्यात भौतिकशास्त्र, अंतरिक्ष विज्ञान, रसायनशास्त्र, आणि पृथ्वी विज्ञान यांचा समावेश आहे. जीवन विज्ञान किंवा जैविक विज्ञान

                                               

भारतीय विज्ञान संस्था

भारतीय विज्ञान संस्था ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच doctoral कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियान्त्रिकीमध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे.

                                               

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ

पशु वैद्यक क्षेत्रातील शिक्षणाकरीत डिसेंबर 2000 मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.

रमण विज्ञान केंद्र
                                               

रमण विज्ञान केंद्र

रमन विज्ञान केंद्र, नागपूर हे कोलकाताच्या राष्ट्रीय कौन्सिल ऑफ सायन्स म्युझीअम्सचे एक घटक आहे, जे संस्कृती मंत्रालयाच्या अधीन आहे. विदर्भ क्षेत्रातील जनते आणि विद्यार्थ्यांमधील विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी १९८९ मध्ये हा केंद्रस्थापित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील प्रथम भारतीय नोबेल पुरस्कार विजेता सर सी व्ही रमण हे नागपूरमधील महालेखापरीक्षकांच्या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे या केंद्राला हे नाव मिळाले.

आनुवांशिक जनुकशास्त्र
                                               

आनुवांशिक जनुकशास्त्र

आनुवांशिक जनुकशास्त्र हे जनुकशास्त्राची पुढची श्रेणी आहे. मानवात, तसेच बहुतेक सजीवांच्या पेशींच्या केंद्रातील डीएनएवरील माहिती ए, टी, जी आणि सी या रासायनिक स्वरुपांत असते. या रासायनिक स्वरुपांत बदल होतो पण डीएनएची श्रृंखला तशीच असते, या रासायनिक स्वरूपातील बदलांचा अभ्यास आनुवांशिक जनुकशास्त्रात केला जातो. भारतातील नामवंत शास्त्रज्ञ संजीव गलांडे यांनी या विषयात संशोधन केले आहे. ‎

धातुशास्त्र
                                               

धातुशास्त्र

धातू मूलद्रव्ये, त्यांची आंतरधात्वीय संयुगे, मिश्रधातू म्हणून ओळखली जाणारी धातूंची मिश्रणे या सर्वांच्या भौतिक व रासायनिक वर्तनाचा अभ्यास करणारी धातुशास्त्र किंवा धातुविज्ञान ही पदार्थविज्ञानातील एक शाखा आहे. धातूंच्या तंत्रज्ञानास, अर्थात धातू व्यावहारिक उपयोगात कसे आणले जातात या विद्येसही, धातुशास्त्र म्हणतात.

फॅरनहाइट
                                               

फॅरनहाइट

फॅरनहाइट हे तापमान मोजण्याचे एक एकक आहे. डॅनियल फॅरनहाइट ह्या जर्मन शास्त्रज्ञाने १७२४ साली ह्या एककाचा शोध लावला. ह्या मोजमापानुसार ३२ फॅरनहाइटला पाणी गोठते व २१२ फॅरनहाइटला पाणी उकळते. सध्या जगातील बहुतांशी देशांनी फॅरनहाइटचा वापर थांबवून सेल्सियस ह्या एककाचा स्वीकार केला आहे. अमेरिकेमध्ये मात्र अजुनही फॅरनहाइट हेच एकक वापरले जाते.

भिंग
                                               

भिंग

भिंग ही बहिर्वक्र आकाराची काचेची चकती असून त्याचा उपयोग कोणत्याही वस्तूच्या प्रतिमेचे दृष्य रूप मोठे करण्यासाठी होतो. बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र भिंगांच्या विशिष्ट रचनेने दुर्बिण आणि सूक्ष्मदर्शक तयार करता येतो.

                                               

विज्ञानदिन

फेब्रुवारी २८ हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा करण्यात येतो. विज्ञानप्रसारविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. वैज्ञानिक दृष्टिकोन शोधक वृत्ती मानवतावाद आणि सुधारणा यांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे या घटनेतील कर्तव्याची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनिष्ट परंपरांचा पगडा उतरवून निर्भयपणे विज्ञानवाद स्वीकारावा असे आवाहन यात केले जाते.

विद्युतघट
                                               

विद्युतघट

विद्युतघट म्हणजे रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत रुपांतर करणारे साधन होय. अलेस्सान्ड्रो व्होल्टा यांनी त्याचा शोध इ. स. १८०० मध्ये लावला. जॉन फ्रेडरिक डॅनियल यांनी इ. स. १८३६ मध्ये त्याची सुधारित आवृत्ती डॅनियल सेल तयार केली.

शरीररचनाशास्त्र
                                               

शरीररचनाशास्त्र

शरीररचनाशास्त्र हे नावाप्रमाणे शरीरातील असणाऱ्या अवयवांच्या अभ्यासाचे शास्त्र आहे. या मध्ये प्रतिके, आकृत्या, मृतशरीर विच्छदनाद्वारे अवयवांचा अभ्यास केला जातो.

शरीरशास्त्र
                                               

शरीरशास्त्र

शरीरशास्त्राच्यामध्ये खालील भाग येतात. प्रसुतीशास्त्र स्त्रीरोगशास्त्र शरीरक्रियाशास्त्र शरीररचनाशास्त्र शल्यचिकित्सा नेत्रशल्यचिकित्सा विकृतीविज्ञान मूर्छाशास्त्र/भुलशास्त्र