Топ-100
Back

ⓘ आरोग्य - आरोग्य, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेतु, विश्व स्वास्थ्य संस्था, संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद, मृदा आरोग्य कार्ड योजना, विमा, अधोमुख श्वानासन, कंगवा ..
                                               

आरोग्य

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे. पोषण, आहार, व्यायाम, स्वच्छता, इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. आयुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे - समदोष; समाग्निश्च समधातुमलक्रिय; प्रसन्नात्मेन्द्रियमना; स्वस्थ इत्यभिधीयते -साचा:चरकसंहिता सूत्रस्थान अध्यात १.४१ आयुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे - समदोष; समाग्निश्च समधातुमलक्रिय; प्रसन्नात्मेन् ...

                                               

प्राथमिक आरोग्य केंद्र

प्राथमिक आरोग्य केंद्र हे भारतातील आरोग्यसेवेच्या उतरंडीतील सर्वात खालचे एकक आहे देशातील दूरवरच्या भागातील मनुष्यवस्तीपर्यंत किमान आरोग्य सुविधा पोचविण्याच्या उद्देशाने भारतातील मध्यवर्ती सरकारच्या धोरणानुसार.प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि परिचालनाबाबतचे सर्व निर्णय मात्र राज्य सरकारांची आरोग्य खाती घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्र PHC:- साधारणत: सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते. जर लोकसंख्येचा विचार केला तर सर्वसाधारण प्रदेशात ३० हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात २० हजार लोकसंख्येमागे ...

                                               

आरोग्य सेतु

आरोग्य सेतू रोगापासून मुक्तीसाठी असलेला पूल हा भारतीय अनुप्रयोग ॲप आहे. हे कोविड-१९ च्या माहीतीचा मागोवा घेण्यासाठी बनवलेले मोबाईल एप्लिकेशन आहे. जे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केले आहे. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

                                               

विश्व स्वास्थ्य संस्था

विश्व स्वास्थ्य संस्था ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. एप्रिल ७ १९४८ रोजी स्थापन झालेल्या आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात मुख्यालय असणाऱ्या या संस्थेने एका अर्थी राष्ट्रसंघाचे एक उपांग असणाऱ्या आरोग्य संस्थेचे कार्यच पुढे चालविले आहे. डब्ल्यूएचओच्या व्यापक आदेशात सार्वभौमिक आरोग्य सल्ला, सार्वजनिक आरोग्याच्या जोखमीवर देखरेख, आरोग्य आपत्कालीन प्रतिक्रियांचे समन्वय, मानवी आरोग्य प्रसार यांचा समावेश आहे. डब्ल्यूएचओने सार्वजनिक आरोग्यासाठी केलेल्या अनेक कामांमध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे, विशेषत: रोग निर्मूलन, पो ...

                                               

संजीवनी आरोग्य प्रकल्प, औरंगाबाद

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ - संजीवनी आरोग्य प्रकल्प संजीवनी आरोग्य प्रकल्प ५ नोव्हेंबर इ.स. २००९ पासून औरंगाबाद जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या प्रकल्पा अंतर्गत माता बाल आरोग्यावर विशेष लक्ष केन्द्रित केले आहे. सुरवातीस या प्रकल्पा अंतर्गत ९ गावांचा समावेश होता. २०१३ मध्ये या मध्ये २ गावांची भर टाकून एकूण 11 गावांमध्ये हा प्रकल्प चालू आहे. या मध्ये महिन्यातून १ वेळेस गरोधर मातांची तपासणी केली जाते. या तपासणी मध्ये ग्रामीण पातळीवर रक्तदाब बाळाच्या ह्रदयाचे ठोके फिटल मॉनिटर ने एकणे इत्यादि तपासण्या अत्यल्प शुल्क घेऊन केल्या जातात. पुढील तपासणी साठी शहरी रुग्णालयात पाठवले जाते. या ...

                                               

मृदा आरोग्य कार्ड योजना

मृदा आरोग्य कार्ड योजना ही भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु केलेली एक योजना आहे. १९ फेब्रुवारी २०१५ ला सुरतगड येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला,या योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करण्याची योजना आखली आहे.यामध्ये पीकांनुसार शिफारसी, आवश्यक पोषक तत्त्वे व त्या शेतीनुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिल्याजाईल. जेणेकरुन, शेतक्ऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल.सर्व मातींच्या नमून्यांची चाचणी देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जाईल.त्यानंतर तज्ज्ञ हे त्या मातीची ताकत व दुबळेपणा तपासतील व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक ...

                                               

आरोग्य विमा

आरोग्य विमा म्हणजे एखाद्या व्यक्‍तीस किमान २४ तास रुग्णालयात दाखल करावे लागल्यास त्यादरम्यान येणाऱ्या खर्चाची भरपाई मिळण्याची व्यवस्था होय. आरोग्य विमा हा फायद्यासाठी नसून भरपाईसाठी असतो.

अधोमुख श्वानासन
                                               

अधोमुख श्वानासन

अधोमुख श्वानासन हे एक योगासन आहे. शरीर लवचिक होण्यास या आसनाची मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते. अधोमुख श्वानासन सूर्यनमस्कारांतर्गत आसनांपैकी एक आसन आहे.

                                               

अध्ययन विकृती

अल्पकालिक सुधारणा होते परंतु समस्या पुन्हा उद्दभवते व्यक्तिगत, सामाजिक, व शैक्षणिक समस्या येतात का असे पहिले असता प्रौढव्यक्तीत पूर्वीच्या समस्या तश्याच चालू राहतात अध्ययन विकृती असलेल्या मुलांचे नेमके काय कुठे कसे चुकते हे निश्चित लक्ष्यात आलेले नसल्याने त्याच्यावरील उपचाराला म्हणावे तेवढे यश अजून आलेले नाही संदर्भ ; चिकित्सा मानसशास्त्रज्ञ डॉ भाग्यवंत मंगेश

अनाहत चक्र
                                               

अनाहत चक्र

अनाहत चक्र हे एकूण बारा मुख्य चक्रांपैकी एक आहे. चक्र ही एक योग विषयक संकल्पना आहे. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रित करतात असे मानले जाते.

आज्ञा चक्र
                                               

आज्ञा चक्र

आज्ञा चक्र हे एकुण बारा मुख्य चक्रांपैकी एक आहे. चक्र ही एक योग विषयक संकल्पना आहे. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रीत करतात असे मानले जाते.

कंगवा
                                               

कंगवा

एका बाजूनें दाते असलेली केस विंचरण्याची फणी असते. ही अनेक दात असलेली प्रामुख्याने केस विंचरण्यासाठी वापरात येणारी वस्तू आहे. कंगव्याने केसातील कोंड्याचे काहीवेळा उपचार होउ शकतात. ही वस्तू मानवी इतिहासात सुमारे ५००० वर्षांपासून वापरात असलेली दिसून येते. परस्परांचे कंगवे वापरल्याने केसांतले संसर्गजन्य रोग होतात अथवा वाढतात.

                                               

कफ

आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष. कफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक lubricant आहे. तो जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो.

घटसर्प
                                               

घटसर्प

घटसर्प हा कॉरीनीबॅक्टेरीयम डीप्थेरीया या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. श्वसन मार्ग फुफ्फुसे, घसा, तोंड किंवा त्वचेवरील जखम यांना प्रभावित करणारे हे संक्रमण आहे.

चक्र (योग)
                                               

चक्र (योग)

एकूण बारा मुख्य चक्रे आपल्या शरीरात असतात असे मानले गेले आहे. चक्र ही एक योगविषयक संकल्पना आहे. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रित करतात असे मानले जाते.

                                               

पंचगव्य

पंचगव्य म्हणजे भारतीय गाईचे दूध, मूत्र, शेण, तूप व दही. या पाचही गोष्टींना आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदिक उपचारात यांचा वापर होतो. ही पंचगव्ये वापरून करण्यात येणाऱ्या रोगचिकित्सेला पंचगव्य चिकित्सा म्हणतात.